लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुती आणि मविआमधील तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला दिसत नाहीये. अजून काही जागांवर उमेदवार निश्चित होणे बाकी आहे. यातच आता एक मोठी नी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र आता खुद्द खासदार श्रीनिवास पाटलांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता तिथे नेमका आता कोण उमेदवार शरद पवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत.
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभेतून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे सातारा लोकसभेत ट्विस्ट निर्माण झाला आहे. अजून महायुतीने देखील आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये. मात्र उदयनराजे यांना भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आज शरद पवार सातारा दौऱ्यावर असून माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र आता श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्याने कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सातारा लोकसभा निवडणूक लढविण्यास श्रीनिवास पाटलांनी स्पष्ट नकार दिला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी माघार घेतत्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा होती. श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय सारंग पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती.