तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे, कारण राज्यातील सर्व 39 लोकसभेच्या जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर आज (29 मार्च) संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नमो ॲपद्वारे (Namo App) “एनाथू बूथ वलिमय्याना” या सत्रात तामिळनाडूच्या भाजप (Bjp) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
X वरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधानांनी तमिळनाडूमधील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सुशासनाचा अजेंडा प्रभावीपणे सांगण्यासाठी केलेल्या मेहनतीचेही कौतुक केले. “मी आज संध्याकाळी 5 वाजता नमो ॲपद्वारे आमच्या मेहनती @BJP4TamilNadu कार्यकर्त्यांसोबत ‘इनाथु बूथ वलिमाय्याना बूथ’ या संवादाची आतुरतेने वाट पाहत आहे. तामिळनाडूमधील आमचे कार्यकर्ते लोकांमध्ये काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “हे तितकेच खरे आहे की तमिळनाडू द्रमुकच्या (DMK) चुकीच्या कारभाराला कंटाळले आहे आणि आमच्या पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे.”
तत्पूर्वी, तामिळनाडू भाजपचे प्रमुख आणि कोईम्बतूरमधील पक्षाचे उमेदवार के अन्नामलाई यांनी बुधवारी सांगितले की, तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी लाट आहे. “तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी लाट आहे हे अगदी स्पष्ट आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 19 एप्रिल रोजी कोईम्बतूरचे लोक, तामिळनाडूचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबरदस्त मतदान करतील. 4 जून रोजी एका नवीन युगाची सुरुवात होईल जिथे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यासाठी काम करणारे सर्व उमेदवार विजयी होतील. कोइम्बतूरमध्ये भाजपला 60 टक्के मते मिळतील,” असे अन्नामलाई यांनी एएनआयला सांगितले.