आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. कालचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोघांमध्ये पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिल्लीचा पराभव केला आहे. गुरुवारी येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग T20 सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा केल्यानंतर दिल्लीचा डाव पाच गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावांवर रोखला. दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ४४ आणि डेव्हिड वॉर्नरने ४९ धावा केल्या. राजस्थानकडून नांद्रे बर्जर आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दरम्यान दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे. यावर कर्णधार रिषभ पंत याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रिषभ पंत म्हणाला, ”मी कालच्या सामन्याबद्दल नक्कीच निराश आहे. मात्र यातून आपण काहीतरी चांगली गोष्ट शिकू शकतो. गोलंदाजांनी १५-१६ षटकांमध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली. फलंदाज कधी-कधी डेथ ओव्हर्समध्ये खेळतात आणि पटकन धावा काढतात, हेच या खेळात घडले. मार्श आणि वॉर्नर यांनी चांगली सुरुवात केली, पण मधल्या षटकांमध्ये आम्ही काही विकेट गमावल्या आणि शेवटी आम्हाला बऱ्याच धावा कराव्या लागल्या. इतरही पर्याय आहेत, आम्हाला नॉर्टजेने डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करावी अशी आमची इच्छा होती आणि काहीवेळा तुम्ही धावांसाठी जाऊ शकता, आशा आहे की आम्ही पुढील सामन्यात आणखी चांगली कामगिरी करू शकू.”
मुंबईची पण निराशाजनक कामगिरी
आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स हा संघ नवीन कर्णधारासह उतरला आहे. मात्र दोन सामन्यात मुंबई इंडियनसला पराभवाचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला अपेक्षित असे यश मिळताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा हुकुमी एक्का कधी फिट होणार याची काळजी संघाला आणि मॅनेजमेंटला आहे.