देशात लोकसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी निकाल लागणार आहे. दरम्यान आयकर विभागाने काँग्रेसचे खाते गोठवले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नसल्याचे काही दिवसांपूर्वी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र लोकशाही टिकून द्यायची नाही यासाठी केंद्र सरकारने असे कृत्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र थकीत रक्कम थकवल्याने आयकर विभागाने काँग्रेसची खाती गोठविली आहेत.
आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला १,७०० कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे, ही माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. कर नोटीसला आव्हान देणारी पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर एका दिवसानंतर काँग्रेसला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नोटीस २०१७-१८ ते २०२०-२१ या वर्षाच्या मूल्यांकनासाठी आहे, त्यात दंड आणि व्याज दोन्ही समाविष्ट आहेत.
इन्कम टॅक्स विभागाने काँग्रेस पक्षाला 105 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस स्थगित करण्यासाठी काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, आयटीएटीचा आदेश कायम ठेवत न्यायालयाने काँग्रेसची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच काँग्रेसला आयटीएटीमध्ये नव्याने युक्तीवाद करण्यास सांगितले आहे.
इन्कम टॅक्स विभागाने काँग्रेसला 105 कोटींहून अधिकच्या थकबाकीसाठी वसुलीची नोटीस पाठवली होती. याप्रकरणी काँग्रेसने आयटीएटी या आयकर अपिलीय न्यायाधिकरणाकडे अर्ज सादर केला होता. परंतु, आयटीएटीने काँग्रेसचा अर्ज फेटाळल्यामुळे काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्या. यशवंत वर्मा आणि न्या. पुरुषेद्र कौरव यांच्या खंडपीठापुढे १२ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काँग्रेसला खडसावले होते.