राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसून येत आहेत. कधी कडक उन्हाळा तर, कधी पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. एप्रिल आणि मे महिना सुरु होण्याआधीच वातावरणात गरमा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. राज्यातील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई , कोकण आणि काही भाग सोडून राज्यात बाकी ठिकाणी पारा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्यभरात उष्माघाताचे आतापर्यंत १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वाढत्या उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत.
राज्यात ऊषामाघातचे १३ रुग्ण आढळून आलेत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका राज्यातील नागरिकांना बसत आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तुम्हाला तहान लागली नसेल तरीही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसभरात ज्या वेळेत जास्त उष्ण असते त्या वेळेस सावलीच्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा. कापसापासून तयार केलेलं हलके, सैल कपडे परिधान करावेत. गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे. चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी रुमाल आणि डोळ्यांसाठी सनग्लासेसचा वापर करावा. अशी मार्गदर्शक तत्वे सरकारने जाहीर केली आहेत.
उष्मघाताची अति प्रमाणात घाम येणे, चक्कर येणे, अशक्तपणा येणे आणि मळमळ होणे अशी लक्षणे असतात. अशी लक्षणे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील ओळखीत कोणाला जाणवत असल्यास त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत घेण्यास सांगावे. राज्य सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच काही सूचना देखील जरी केल्या आहेत.