भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय नौदल जगातील शक्तिशाली नोदल आहे. अरबी समुद्र आणि हिंद महासागरात भारतीय नौसेनेची ताकद अक्ख्या जगाला माहिती आहे. भारताच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य दले कायमच तयार असतात. नौदलाने पुन्हा एकदा समुद्री चाच्यांपासून अनेकांची सुटका केली आहे. गेल्या काही दिवसांत नौदलाने अशाप्रकारच्या कारवाया केल्या आहेत. भारतीय नौदलाने इराणी मासेमारी जहाज “अल-कंबर” आणि २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली आहे ज्यांना अरबी समुद्रात १२ तासांच्या चाचेगिरी विरोधी ऑपरेशनमध्ये “ओलिस” ठेवण्यात आले होते. दीर्घ मोहिमेनंतर सुटका करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
नौदलाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, भारतीय नौदलाची तज्ञ पथके मासेमारी नौकेची कसून तपासणी करत आहेत जेणेकरून मासेमारी पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेले जाऊ शकते. “भारतीय नौदल या प्रदेशातील सागरी सुरक्षा आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे निवेदनात म्हटले आहे. नौदलाने सांगितले की, “आयएनएस सुमेधाने शुक्रवारी पहाटे FV ‘अल कनमार 786’ ला रोखले आणि नंतर INS त्रिशूल देखील या कारवाईत सामील झाली.
इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर एडनचे आखात, लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील व्यापारी जहाजांवर हल्ले लक्षणीयरीत्या वाढले आहेत. प्रत्येक वेळी भारतीय नौदलाने मदतीचा हात पुढे केला आहे. चाचेगिरीविरोधी, ड्रोनविरोधी आणि क्षेपणास्त्रविरोधी हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. चाच्यांविरुद्धच्या कारवाईत १० हून अधिक युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत.