पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जेष्ठ क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. मोदींनी वर्मा यांचे स्वातंत्र्य चळवळीचे दिग्गज म्हणून स्मरण केले आणि नमूद केले की त्यांची अदम्य भावना आणि स्वातंत्र्याच्या कार्यासाठी असलेली वचनबद्धता कधीही विसरता येणार नाही. भारत हाऊसच्या स्थापनेमध्ये वर्मा यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला, ते परदेशात राहून स्वातंत्र्य लढ्यासाठी झटले.
2003 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, स्वित्झर्लंडमधून वर्मा यांच्या अस्थी परत आणल्या होत्या जिथे त्यांचे 1930 मध्ये निधन झाले होते.
“महान श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक दिग्गज, स्वातंत्र्याप्रती त्यांची असलेली बांधिलकी कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या इंडिया हाऊसची स्थापना केवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशात राहून योगदान देता यावे म्हणून केली होती. ज्या आदर्शांसाठी त्यांनी लढा दिला त्या आदर्शांना कायम ठेवण्याचा संकल्प करूया,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हंटले आहे. गुजरातमध्ये जन्मलेले, श्यामजी कृष्ण वर्मा हे स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी होमरूल सोसायटी आणि इंडियन सोशिऑलॉजिस्ट ही दोन पत्रके काढली. या पत्रकांमध्ये ब्रिटीश साम्राज्यावर टीका केली जात असे.
ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी येणार्या भारतीय तरुणांसाठी त्यांनी इंडिया हाऊस नावाच्या वसतीगृहाची स्थापना केली. ब्रिटनमध्ये वास्तव्याच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर इंडिया हाऊसमध्ये वास्तव्य करत होते.ते लंडनमध्ये बॅरिस्टर होते आणि नंतर वसाहतवादी सरकारवर टीका केल्याबद्दल त्यांना कायद्याचा सराव करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. वर्मा यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचाही अभ्यास केला.