शिर्डीची काँग्रेस ची जागा अखेर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेली असल्याने राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस चे अहमदनगर जिल्ह्यातील अस्तित्व टिकवीण्यासाठी शिर्डी नाही तर मग अहमदनगर दक्षिणची जागा काँग्रेसला मिळावी अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केली असल्याची माहिती आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली आहे.
अहमदनगर दक्षिण मध्ये आतापर्यंत एक अपवाद सोडता सातत्याने भाजप विजयी होत असून हा भाजपचा विजयाचा रथ रोखण्यासाठी राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस भाजपला आव्हान देऊन भाजपला नामोहरम करून निर्णायक ठरू शकतो.या मतदारसंघात काँग्रेस चे हक्काचे अडीच ते तीन लाख मतदार या मतदारसंघात आहेत .त्याचा फायदा भाजपला पर्याय म्हणून राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला होऊ शकतो कारण काँग्रेसने ओबीसीच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी विविध आंदोलने करून व निवेदन देऊन लढा दिला आहे.२०१९ च्या लोकसभेला सुजय विखे हे काँग्रेस मधून भाजप मध्ये गेले पण त्यांना तेव्हा लोकसभेला भाजप पेक्षा सर्वात जास्त मदत ही आतून काँग्रेसची होती.म्हणून ते खासदार म्हणून निवडून आले.
पण त्यानंतर त्यांनी त्यांना मदत केलेल्या सर्वाना मात्र दुर्लक्षित केले.यावेळी मात्र काँग्रेस,भाजप पक्ष व भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याने सुजय विखे यांची तेव्हा त्यांना ती मिळालेली मते कमी होणार आहेत.खरं तर २०१९ ला सुजय विखे हे काँग्रेसच्या जीवावर खासदार बनले ही सत्य स्थिती असून आता मात्र काँग्रेस आक्रमक भूमिकेत असल्याने त्याच खासदार सुजय विखे यांना काँग्रेस पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुद्धा यावेळी काँग्रेस ला नगर दक्षिण मधून लढण्याची संधी देऊन भाजपचा विजयाचा रथ रोखण्यासाठी सहकार्य करावे व ही जागा मन मोठं करून काँग्रेसला सोडावी ही सर्व काँग्रेसच्या हितचिंतकांची मागणी असल्याचे मंगल भुजबळ यांनी म्हटले आहे.