लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु झाला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांनी काही जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. कारण अजित पवार त्यांच्या सहकारी आमदारांसह काही महिन्यापूर्वी शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील झाले. त्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार हे जवळपास निश्चित आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र या दोघांमध्ये पुरंदरचे शिवसेनेचे नेते आणि अजित पवारांचे विरोधी विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले. आता शिवतारेंबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांना बहुमताने निवडणून आणण्याची घोषणा शिवतारेंनी केली आहे.
विजय शिवतारेंनी बारामतीमधून लढण्याचा निर्णय मागे घेतत्याने अजित पवारांना तसेच महायुतीला दिलासा मिळाला आहे. मात्र सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे आपले ध्येय आहे. आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. महायुतीचा उमेदवार निवडणून आणून मोदींचे हात बळकट करायचे आहेत असा ठराव आम्ही आज केला. मुख्यमंत्री शिंदेंना अडचण होऊन नये यासाठी माघार घेतल्याचे शिवतारे म्हणाले.
विजय शिवतारे यांनी बारामतीची निवडणूक अपक्ष लढविण्यावर ठाम होते. त्यामुळे अजित पवार आणि महायुतीचे टेन्शन वाढले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईने विजय शिवतारेंनी आता बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत शिंदे, फडणवीस, पवारांमध्ये आणि शिवतारेंमध्ये झालेली बैठक यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.