देशात लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीसाठी जाहीरनाम्याचा तयारीसाठी भाजपाने एक समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये एकूण २७ जणांचा समावेश करण्यात आला आहे. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कमिटीच्या संयोजिका असणार आहेत. तर पियुष गोयल हे सहसंयोजक ही जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्यात वरील नेत्यांसह चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू साय यांचा समावेश कऱण्यात आला आहे. अर्जुन मुंडा, किरेन रिजिजू, अश्विनी वैष्णव, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी यांसारख्या मोठ्या नावांचाही या समितीत समावेश आहे.