बारामती लोकसभा लढणारच, असा निर्धार केलेल्या विजय शिवतारेंनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना आणि सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जनता अजित पवारांना मतदान करणार नाहीत, त्यांचा उर्मटपणा गेला नाही, असे म्हणाऱ्या शिवतारेंनी अखेर यु-टर्न घेत सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू, अशी घोषणा केली आहे.
‘दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत, मुख्यमंत्र्याशी झालेल्या बैठकीत अशा सर्वांना सुचना देण्यात आल्या. अजित दादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदींना करायचे हे आमचे सगळ्यांचे ध्येय आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील जाता कामा नये असं काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणायचा’, असे ते म्हणाले आहेत.
आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला पर्यायाने एकनाथ शिंदे यांना फार मोठा फटका बसला असता असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.तसेच मी मी आपल्या तीनही नेत्यांशी बोलून आपल्या मतदार संघातील रखडलेल्या योजनांची परिस्थिती समजावून सांगितली. त्यामुळे राज्य सरकारने या योजनांना चालना देण्याचे आश्वासन दिल्याने आपण निवडणूकीतून अखेर माघार घेतल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.