आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. मुंबईत आरबीआयला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत
भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) 90 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ सोमवारी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दासही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती आणि 1 जानेवारी 1949 रोजी तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ही केंद्रीय बँकिंग प्रणाली आहे. त्याची नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे प्रादेशिक कार्यालये आहेत.