भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बहुप्रतीक्षित जाहीरनामा समितीची (Manifesto Committee) 27 सदस्यांची, आज पक्षाच्या मुख्यालयात पहिली बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता होणारी ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
ही समिती विशेषतः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आली असून त्यात केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री अशा विविध सदस्यांचा समावेश आहे.
आगामी निवडणुकांसाठी सर्वसमावेशक आणि आश्वासक जाहीरनामा तयार करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची सुरुवात म्हणून ही उद्घाटन बैठक खूप महत्त्वाची ठरणार आहे. आहे. भाजपच्या भविष्यातील योजना आणि आश्वासनांची झलक दाखवणाऱ्या या बैठकीच्या निकालाची पक्षाचे समर्थक आणि टीकाकारही आतुरतेने वाट पाहत आहेत.या बैठकीमध्ये लोकसभेचा जाहीरनामा तयार करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या जाहीरनाम्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी ही निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. या समितीचे काम जाहीरनामा तयार करण्याचे आहे. ज्यामध्ये एकूण 27 सदस्यांची नावे आहेत. या समितीचे अध्यक्ष राजस्थान सिंह असतील, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संयोजक बनवण्यात आले आहे. तसेच पियुष गोयल यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.