आजपासून देशात आर्थिक बदल झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आजपासून औषधांच्या किमती महाग झाल्या आहेत. आता 384 हून अधिक औषधे महाग झाली आहेत.
आता औषधांचे दर सुमारे 12 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे लोकांना अँटीबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा औषधांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
आजपासून मलेरिया, कॅन्सर, हृदयविकार, अँटी सेप्टिक अशी अनेक औषधे नवीन दरात उपलब्ध होणार आहेत. तसंच सरकारने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांका (WPI) नुसार औषधांचे दर वाढवण्याची परवानगी फार्मास्युटिकल कंपन्यांना दिली आहे.
नियमानुसार औषधांच्या कंपन्या वर्षभरात केवळ 10 टक्के दर वाढवू शकतात. पण यावेळी औषधांचे दर 2 टक्के म्हणजेच 12 टक्के अधिक दर वाढवण्यात आले आहेत.