सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व पक्ष आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसत आहेत. मात्र महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कायमच आपल्या विधानांसाठी चर्चेत असतात. निवडणुकीमुळे विरोधकांवर टीका करण्यात ते सध्या अग्रेसर आहेत. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदींची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी केली आहे. राऊत यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. मी भ्रष्टाचार करू देणार नाही, असं नरेंद्र मोदी आपल्या सभांमध्ये म्हणत आहेत. रोज सरासरी पाच भ्रष्ट नेते भाजपत प्रवेश करतात, असे राऊत म्हणाले. तसेच मोदी आज एका रॅलीत म्हणाले की, मी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. मोदींचे हे विधान म्हणजे सर्वांत मोठा विनोद आहे. जॉनी लिव्हर यांच्यानंतर जर कोणी सर्वांत मोठा विनोद करत असेल तर ते गुजरातचे लिव्हर आहेत अशी टीका राऊतांनी मोदींवर केली होती. त्याला आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
https://twitter.com/PrasadLadInd/status/1774695034593710266
पंतप्रधान मोदी हे देशातील १४० कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. पंतप्रधानांवर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाच्या नाच्याला माहिती नाही. सकाळी उठून लिपस्टिक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोलले जातेय. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातोय. ‘अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,’ असं प्रसाद लाड राऊतांना म्हणालेत. अशा प्रकारचे कृत्य परत केल्यास मी तुम्हाला जी असे म्हणणार नाही. संजय तुला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका लाड यांनी राऊतांवर केली आहे.