परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या कचाथीवू बेटाबद्दलच्या काँग्रेसच्या टीका केली आणि ते म्हणाले की पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी हे बेट केवळ ‘निरुपयोगी म्हणून पाहिले.
“हे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ च्या मे महिन्यात केलेले निरीक्षण आहे.ते लिहितात, मी या छोट्या बेटाला अजिबात महत्त्व देत नाही आणि त्यावरचा आमचा दावा सोडण्यास मला अजिबात संकोच वाटणार नाही. त्यामुळे पंडित नेहरूंसाठी हे एक छोटेसे बेट होते. त्याचे त्यांना महत्त्व नव्हते. त्यांनी याला उपद्रव म्हणून पाहिले,” असे जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तर नंतरच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या बेटाला “छोटा खडक” अशी उपमा दिली होती. 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी “भारत-श्रीलंका सागरी करार” अंतर्गत कचथीवू हा श्रीलंकेचा प्रदेश म्हणून स्वीकारला.
मात्र याच दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असा करार झाला होता की, भारतातले मच्छिमार वापरू शकतात. मात्र आजही मच्छिमारांना ताब्यात घेतले जात आहे, बोटी पकडल्या जात आहेत आणि हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला जात आहे.
“गेल्या 20 वर्षात श्रीलंकेने 6184 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे आणि 1175 भारतीय मासेमारी नौका श्रीलंकेने जप्त केल्या आहेत. गेल्या पाच वर्षात कच्चाथीवू आणि मच्छिमारांचा प्रश्न विविध संसदेत मांडण्यात आला आहे.
1983 मध्ये लंकेचे गृहयुद्ध सुरू झाल्यापासून, ही बेटे भारतीय तमिळ मच्छिमार आणि सिंहली-बहुल लंकन नौदल यांच्यातील लढाईसाठी रणभूमी बनली आहेत, ज्यामुळे अपघाती क्रॉसिंगमुळे भारतीयांचे जीवन, मालमत्ता आणि जीवितहानी होते.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याबरोबरच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही काँग्रेसच्या कचाथीवूबाबतच्या धोरणांवर हल्लाबोल केला आहे. . “कधी काँग्रेसचे खासदार देशाचे विभाजन करण्याचे बोलतात तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरांना बदनाम करतात. यावरून ते भारताच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात असल्याचे दिसून येते. त्यांना फक्त आपल्या देशाचे तुकडे करायचे आहेत.असे त्यांनी म्हंटले आहे”.