बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर काहीना काही कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. त्यामुळे मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमी आतुर असतात. त्यात वयाच्या 50 व्या वर्षातही मलायकाचा बोल्डनेस पाहून सर्वजण चकीत होतात. मलायका ही तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते.
सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून मलायका प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या मलायकाच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मलायकाने रॅम्प वॉक केला. यावेळी मलायकाने सिल्व्हर कलरचा वन पिस परिधान केला होता, ज्यात ती खूपत हॉट आणि बोल्ड दिसत होती. पण यावेळी मलायकाचा बेबी बम्प दिसून आला. त्यामुळे मलायकाच्या या व्हिडीओनंतर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/C5Gtx1vCGTc/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, आता या व्हिडीओनंतर मलायका गरोदर आहे का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तसंच तिच्या या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करताना दिसत आहेत. सोबतच मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. मात्र, मलायकाने अद्याप याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाहीये.