आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. दरम्यान नवीन आर्थिक वर्षांमध्ये केंद्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ३० रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये ३० ते ३२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसून येत होती. दरम्यान १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ३० ते ३२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता दोन तीन महिन्यांनी सिलेंडरच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. एलपीजी व्यवसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. १ एप्रिल २०२४ म्हणजेच नवीन आर्थिक वर्षात ३०.५० रुपयांची कपात एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. घरगुती सिलेंडर हा साधारण १४ किलोचा असतो. १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आलेली नाहीये. तब्बल तीन महिन्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे.