केदार जाधव हा भारतीय क्रिकेटर आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून केदार जाधव लोकप्रिय आहे. दरम्यान आता केदार जाधव राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे केदार जाधवने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. केदार जाधव लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र काल झालेली भेट ही खाजगी कामानिमित्त असल्याचे समोर आले आहे. केदार जाधव -फडणवीस यांच्या भेटीदरम्यान आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
केदार जाधव हा मूळचा पुण्याचा आहे. देशातंर्गत क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव पुणे संघाचे नेतृत्व करतो. केदार जाधवने पुण्यातच फडणवीसांची भेट घेतली आहे. इतर भाजप नेते देखील यावेळी उपस्थित होते. याआधी देखील केदार जाधवने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदार जाधव आणि फडणवीसांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना दिसत आहे. त्यातच आता केदार जाधवने फडणवीसांची भेट घेतल्याने त्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले आहे.