आयपीएलच्या १७ व्य हंगामात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघात सामना होत आहे. दरम्यान आजचा सामना हा वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. मुंबई इंडियन्स आपले पहिले दोन्ही सामने हरून आजचा तिसरा सामना खेळत आहे. तर राजस्थान रॉयल्स दोन्ही सामने जिंकून आजचा सामना खेळत आहे. मुंबई प्रथम फलंदाजी करत असून त्यांचे तीन खेळाडू बाद झाले आहेत. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. दरम्यान या सामन्याला वानखेडेवर मोठी गर्दी जमली आहे. स्टेडियमबाहेर आणि आत रोहित शर्माचे चाहते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
वानखेडे स्टेडियमवर आणि बाहेर मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा देण्यात येत आहेत. मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने हार्दिक पंड्याला मुंबईचा कर्णधार केल्यानंतर रोहितचे चाहते नाराज झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन सामन्यात चाहत्यांनी हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईचा संघ वानखेडेवर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. स्पर्धेत नवी उभारी घेण्यासाठी मुंबईला विजय आवश्यकच आहे. सर्व खेळाडूंचा कस पणास लागेलच, पण कर्णधार हार्दिक पंड्यासाठी अस्तित्व पणास लागणार सामना आहे. अहमदाबाद आणि हैदराबाद यानंतर वानखेडेवर हार्दिक पंड्या विरुद्ध प्रेक्षक हा सामना कसा होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आजचा सामना जिंकून मुंबईला या स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थान आपला तिसरा विजय प्राप्त करण्यासाठी मैदानात उतरेल यात काहीच शंका नाही.