काल (1 एप्रिल) IPL 2024 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघाला 126 धावांचे लक्ष्य दिले होते. जे राजस्थान रॉयल्स संघाने सहज साध्य केले. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने उत्कृष्ट खेळी करत अर्धशतक झळकावले.
कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबईने दिलेले 126 धावांचे लक्ष्य राजस्थानने 15.3 षटकांत केवळ 4 गडी गमावून पूर्ण केले.
राजस्थान रॉयल्स संघाच्या वतीने रियान परागने शानदार फलंदाजी करत 54 धावांची नाबाद खेळी खेळली. राजस्थानचा हा सलग तिसरा विजय आहे, तर मुंबईचा तिसरा पराभव.
मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 125 धावा केल्या. मुंबईकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. तर संघाकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर तिलक वर्माने 32 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी तीन बळी घेतले.