सध्या उन्हाळा प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. मागच्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे खडकवासला धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने यंदा पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुणे सशर्त गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेने बाणेर, बालेवाडी, कात्रज, कोथरूड आणि विमाननगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिन्यांमधील विद्युत दुरुस्ती आणि इतर कामे यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वारजे, चांदणी चौक, आणि भामा आसखेड प्रकल्पातील कामांमुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. नियोजित कामांमुळे या भागात पाणीटंचाई जाणवणार आहे. पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे सिटी परिसर, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, करवेंगार, वारजे, कात्रज, कोंढवा, खादी मशीन चौक, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर रोड, कोरेगाव पार्क, फुरसुंगी आणि हडपसरचा काही भागात पाणी नसणार आहे. तसेच शहराच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.