लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. अनेक जागांवर सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विरोधकांनी ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. देशातील विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी केली जात आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका देखील सादर केली आहे. या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी करण्याची सुप्रीम कोर्टाने निडवणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसंदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने या याचिकेची दाखल घेत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. यामुळे आता या प्रकरणाबाबत आलेल्या नोटिशीला केंद्र सरकारला आणि आयोगाला उत्तर द्यावे लागणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आरोप केले जातात. मात्र तरी देखील केंद्र सरकार निवडणूक ईव्हीएम मशीनवर घाणेवार ठाम आहे. दरम्यान निवडणुकी आयोगाने देखील कोणत्याही पक्षाने ईव्हीएम हॅक करून दाखवावे असे आव्हान दिले होते. मात्र आता केंद्र सरकार आणि निवडणूक अयोग्य ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात आलेल्या कोर्टाच्या नोटिशीला काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.