सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वत्र जाहीर करण्यात आलेल्या ठिकाणी उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. एनडीए म्हणजेच भाजपा सरकारने अब की बार ४०० आर तर इंडी आघाडीने एनडीएला पराभूत करण्यासाठी प्रचार सुरु केला आहे. भाजपाने अरुण गोविल यांना मेरठमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे. अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत प्रभू श्री रामचंद्राची भूमिका साकारली होती. दरम्यान आज अरुण गोविल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. ८० पैकी ८० जागा जिंकण्याचा भाजपा या निवडणुकीत प्रयत्न करताना दिसत आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत श्री रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल यांनी आज मेरठ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी गोविल यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही उपस्थित होते.
अरुण गोविल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागा आणि संपूर्ण देशातील ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठेल, असा कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये आज प्रचंड आत्मविश्वास आहे असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले. दरम्यान भाजपाने यंदाच्या निवडणुकीत अब की ४०० पारचा नारा दिला आहे. दरम्यान आतापर्यंत भाजपाने ७ याद्या जाहीर केल्या आहेत. तर अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. यावेळी अरुण गोविल म्हणाले की, भाजप नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मेरठमधून उमेदवारी दिल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद.