काल मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे मैदानावर सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सनी मुंबईवर विजय मिळविला. मात्र अहमदाबाद आणि हैद्राबाद येथे कर्णधार हार्दिक पंड्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित ऐवजी हार्दिक पंड्याला कर्णधार केल्याने मुंबईच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणत नाराजी आहे. काल वानखेडेवर हार्दिक मोठ्या प्रमाणात ट्रोल होत होता. मात्र रोहित शर्माने यावर असे काही केले, त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबईचा सलग तिसरा पराभव झाला आहे. त्यामुळे आधीच ट्रोल होत असलेला हार्दिक अजून ट्रोल झाला आहे. मात्र कालच्या सामन्यात वानखेडेवर काळ चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करायला सुरुवात केली. तेव्हा रोहित शर्मा बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत होता. हार्दिकने एक कॅच सोडल्यानंतर जोरदार हुटींग करण्यात येत होते. अशा स्थितीत सीमारेषेवर उभ्या असलेल्या रोहित शर्माने हाताने इशारा करत चाहत्यांना थांबण्याचे आवाहन केले. रोहितच्या या स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली. यासाठी चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. हा झेल चुकवल्यानंतरच हार्दिकची हुटींग करण्याची पातळी वाढली होती.
काल (1 एप्रिल) मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरोधात (Rajasthan Royals) पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. मुंबईच्या या खराब कामगिरीमुळे आता रोहिल शर्माला (Rohit Sharma) मुंबईचं कर्णधारपद पुन्हा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.