बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या सोशल मीडियावर चांगलात चर्चेत आला आहे. मागील काही दिवसांपासून आर्यन खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कारण आता आर्यन खान एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्री नसून ती एक ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
मागील काही दिवसांपूर्वी आर्यन खानचं नाव शनाया कपूर, अनन्या पांडे यांच्यासोबत जोडलं जात होतं. पण आता आर्यनचं नाव ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीला (Larissa Bonesi) हिच्यासोबत जोडलं जात आहे. सध्या आर्यन आणि लॅरिसा एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
https://www.instagram.com/p/C4nw9zANsL1/?utm_source=ig_web_copy_link
आर्यन आणि लॅरिसा यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीमध्येही लॅरिसा दिसली आहे. या जाहिरातीमध्ये लॅरिसा आणि आर्यन एकमेकांच्या जवळ उभे असलेले दिसत आहेत. तर यानंतर त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.