आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना आज (2 एप्रिल) जामीन मिळाला आहे. संजय सिंह तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले की, हा सत्याचा विजय आहे. तर भगवंत मान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इन्कलाब जिंदाबाद असे लिहिले आहे.
संजय सिंह यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, ” सत्याचा नेहमीच विजय होतो, संजय सिंह यांना जामीन मिळाला मिळाला आहे. सत्य दाबले जाऊ शकते पण सत्य कधीच मरत नाही, इन्कलाब झिंदाबाद.”
दिल्लीतील दारू घोटाळ्यात संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. संजय सिंग तब्बल 6 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. ईडीने 4 ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांना अटक केली होती.
संजय सिंह यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, संजय सिंह यांच्याकडून एकही पैसा वसूल झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने संजय सिंह यांना जामीन मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय सिंह यांना निवडणुकीच्या कामात सहभागी होता येणार आहे.