शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) हे अडचणीत आले आहेत. कारण त्यांच्या दापोली (Dapoli) येथील साई रिसॉर्टवर (Sai Resort) मोठी कारवाई करण्यात आली आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात ही कारवाई करण्यात आली असून सध्या अनिल परब यांच्या रिसॉर्टचे बांधकाम तोडण्यास सुरूवात झाली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रश्न लावून धरला होता. त्यांनी या रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम करून गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप केला होता. याबाबत सोमय्यांनी तक्रार देखील दाखल होती. तर अखेर आता अनिल परब यांच्या या रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातलं एक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अनिल परब यांच्या रिसोर्ट बांधकाम तोडल्यानंतरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे की, “अनिल परब यांच्या दापोली साई रिसॉर्टवर हातोडा, तोडकाम सुरू. साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदमवर फौजदारी कारवाई प्रक्रियाही सुरू आहे, सध्या दोघे जामीनावर आहेत. हिसाब तो देना पड़ेगा.”
दरम्यान, या प्रकरणी 14 नोव्हेंबर 2022 रोजी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दापोलीतील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परबांचे साई रिसॉर्ट आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.