दिल्लीच्या कथिक अबकारी कर घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने (ED) 21 मार्च रोजी त्यांना ताब्यात घेतलं होतं. तर काल (2 एप्रिल) हायकोर्टाने अरविंद केजरीवालांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच, आता केजरीवालांत्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
तुरूंगात रवानगी झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खराब होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची शुगर लो झाली होती. तर आता पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट मिळाली आहे. आम आदमी पार्टीच्या (AAP) सुत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, अरविंद केजरीवाल यांच्या वजनात घट झाली असून ते सुमारे साडेचार किलोने घटले आहे.
याबाबत तिहार तुरूंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांची प्रकृती आता ठिक आहे. तसंच त्यांच्या प्रकृतीबाबत तुरूंगातील डॉक्टरांना कुठलीही चिंता नाहीये.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना डायबेटिसता त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर तिहार तुरूंगातील वैद्यकिय चिकित्सक नजर ठेवून आहेत. ते सातत्याने त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेत आहेत.