मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘देशात आग लागेल’ ह्या वक्तव्यावर टीका केली आहे आणि राहुल गांधी म्हणतात त्यात तथ्य किंवा गांभीर्य नसते असा टोलाही लगावला आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आज सकाळी जबलपूर जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले आहे.
“त्याच्या म्हणण्यावर(राहुल गांधी) कोण विश्वास ठेवतो? राहुल गांधी जे बोलतात त्यात तथ्य किंवा गांभीर्य नसते. त्यांचाच पक्ष त्यांना गांभीर्याने घेत नाही, तर दुसरा पक्ष , त्यांचे कार्यकर्ते किंवा जनता कशी विश्वास ठेवेल ” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनतेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी म्हटले की, “भाजपने या मॅच फिक्स्ड निवडणुका जिंकल्या आणि संविधान बदलले तर संपूर्ण देश पेटून उठेल. हे लक्षात ठेवा.”
“निवडणुकीचा वातावरण ज्याप्रकारे तापत आहे ते बघता हे स्पष्ट दिसत आहे की, की काँग्रेस यात कुठेच नाही, ती खूप मागे पडत आहे. आणि त्याला राहुल गांधी जबाबदार आहेत. त्यांनी काँग्रेस किंवा निवडणुका कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. अजून थोडा वेळ आहे, आम्हाला आशा आहे की काँग्रेस बाहेर पडेल. त्यांच्या अंतर्गत संघर्षाचे आत्मनिरीक्षण करेल ” असे यादव पुढे म्हंटले आहेत.
दरम्यान,मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढत म्हंटले आहे की “त्यांनी अशी बेफिकीर विधाने करू नयेत”.
“मला वाटते इतक्या वरच्या पातळीवरच्या नेत्याने अशी बेफिकीर विधाने करू नयेत. देशात ज्या प्रकारचा विकास होत आहे, त्यामुळे देशातील जनता भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. देश प्रगती करत आहे आणि गरिबी दूर होत आहे. मात्र राहुल गांधी स्वतः ‘आग ” लावून घेत आहेत त्यांनी अशा मूर्ख गोष्टी बोलू नयेत,” असा सल्ला विजयवर्गीय यांनी राहुल गांधींना दिला आहे.