गडचिरोली, छत्तीसगड आणि देशातील अनेक भागांमध्ये नक्षलवाद ही एक मोठी समस्या आहे. आपली सुरक्षा डोळे मोठे शौर्य गाजवून देशाला घटक असलेल्या दुष्ट शक्तींचा नाश करताना दिसतात. अशीच एक मोठी कामगिरी आपल्या सुरक्षा दलांनी बजावली आहे. विजापूरमध्ये सुरक्षा दलांसोबत नक्षलवाद्यांबरोबर चकमक सुरू होती. या चकमकीत एकूण १३ दहशतवादी ठार मारल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. मंगळवारपासून सुरु असलेली चकमक बुधवारी म्हणजे आजच संपली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. तसेच बरेच नक्षलवादी जखमी देखील झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.
”छत्तीसगड पोलिसांनी नक्षलविरोधी अभयानाच्या इतिहासातील आपली सर्वात मोठी कामगिरी बजावली. काल रात्री झालेल्या चकमकीत विजापूर जिल्ह्यातील गंगलूर भागातील लेंड्रा आणि कोरचोली भागात सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये १ आणि २ एप्रिल रोजी १२ नक्षली ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने नक्षलवादी जखमी झाले आहेत,” असे बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले.
गडचिरोली, छत्तीसगड आणि देशातील अनेक भागांमध्ये नक्षलवाद ही एक मोठी समस्या आहे. आपली सुरक्षा डोळे मोठे शौर्य गाजवून देशाला घटक असलेल्या दुष्ट शक्तींचा नाश करताना दिसतात. पोलिसांकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षवलवादाविरुद्धची लढाई अधिक तीव्र केली आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूक होणार आहेत. दरम्यान नक्षलवादी या अशा लोकशाहीच्या उत्सवांमध्ये विगन आणण्याचे प्रयत्न कृती असतात. मात्र आपली सुरक्षा दले यांनी या पार्श्वभूमीवर नक्षलवादाची लढाई अधिक तीव्र केली आहे.