मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) चांगलाच चर्चेत आहे. शोएब मलिक हा क्रिकेटमुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कारण शोएब आणि सानिय मिर्झाने (Sania Mirza) एकमेकांपासून घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांतच शोएबने तिसरं लग्न केलं. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Jawed) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत होता.
शोएब मलिकने सना जावेदसोबत तिसरं लग्न केल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. अशातच आता तिसऱ्या लग्नाला काही दिवस झाले असतानाच आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीने शोएबवर काही गंभीर आरोप केले आहेत.
शोएब हा तिसरं लग्न झालं असतानाही एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करत असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत स्वत: अभिनेत्रीने खुलासा केला आहे. तसेच या अभिनेत्रीने याबाबतचे स्क्रीनशॉट देखील सांभाळून ठेवले असल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री नवल सईद (Nawal Saeed) हीने नुकतीच एका शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी नवलने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या शोच्या होस्टने नवलला विचारले की, तुला अभिनेत्यांचे फ्लर्टी मेसेज येतात का? त्यावर ती म्हणाली की, अभिनेत्यांचे नाही पण मला पाकिस्तानी क्रिकेटरचे फ्लर्टी मेसेज नेहमी येतात. पण त्यांनी असे केले नाही पाहिजे, कारण ते देशाचे प्रतिनिधित्व करतात.
मी सर्व मेसेजचे स्क्रिनशॉट सांभाळून ठेवले आहेत. यावेळी होस्टने नवलला शोएब मलिक मेसेज करतो का? असे विचारले असता ती इशाऱ्यामध्ये हो म्हणते. शोएबचे नाव ऐकताच होस्ट हसायला लागतो. त्यामुळे आता सना जावेदसोबत लग्न झालं असतानाही शोएब नवलसोबत फ्लर्ट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले असून त्याच्यावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.