महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील जनतेला दिलेले आणखी एक वचन पूर्ण केले आहे. अमेठीशी कौटुंबिक संबंध असलेल्या स्मृती इराणी या आता अमेठी जिल्ह्यातून मतदार झाल्या आहेत.
अमेठी जिल्हा मुख्यालय गौरीगंज तहसील आणि ब्लॉक क्षेत्रांतर्गत मेदन मवाई गावात राहिल्यानंतर त्यांनी कायदेशीर मार्गाने मतदार होण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर त्यांना मेदन मवई गावात मतदार बनवण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिनिधी विजय गुप्ता म्हणाले की,स्मृती अमेठीला आपले कुटुंब मानतात. अमेठी कुटुंबात राहण्यासाठी त्यांनी आपले निवासस्थान येथे बांधले आहे. घराच्या बांधकामासोबतच स्मृतींनी स्वतःला अमेठीतून मतदार बनवण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, आता त्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील गौरीगंज विधानसभा मतदारसंघातील मेदन मेवई गावातील बूथ क्रमांक 347 ची मतदार बनलया आहेत.
अमेठीतून मतदार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ही आपल्या आयुष्यातील मोठी उपलब्धी असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रसंगी त्या म्हणाल्या की यामुळे “अमेठीशी माझे नाते आता आणखी घट्ट होईल.
स्मृती इराणी यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक अमेठीतून जिंकली होती. त्यानंतर त्यांनी आपण इथे घर बांधणार असल्याचे पहिले आश्वासन अमेठीच्या लोकांना दिलं होते . त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीतल्या गौरीगंज भागात मेदन मेवई या ठिकाणी घर बांधले असून फेब्रुवारी मध्ये या घराची पूजा पार पडली होती.
2002 ते 2019 पर्यंत संसदेत अमेठीचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले.काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या जागेवरुन राहुल गांधी तीनवेळा खासदार झाले होते मात्र स्मृती इराणी हा मतदारसंघ जिंकून आपल्या हातात घेतला आणि त्यावरच त्या थांबल्या नाहीत तर निवडणुकीनंतर त्या अमेठीमध्ये जात राहिल्या. तिथल्या जनतेची कामे, अडचणी सोडवत त्यांनी अमेठीतल्या जनतेचे मन जिंकले असल्याचे दिसते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे.