आयपीएलचा १७ वा हंगाम दणक्यात सुरु झाला आहे. आतापर्यंत १४ ते १५ सामने खेळून झाले आहेत. सर्वच सामने हे रंगतदार झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र आज म्हणजेच बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान १५ व्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये हालचाल वाढली आहे. पहिल्या स्थानावर कोणती टीम आहे आणि शेवटच्या नंबरवर कोण आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये सध्या राजस्थान रॉयल्स पहिल्या नंबरवर आहे. दुसऱ्या नंबरवर कोलकाता नाईट रायडर्स तर तिसऱ्या नंबरवर सीएसके आणि आता चौथ्या नंबरवर लखनौ आहे. कालच्या सामन्यात आरसीबी पराभूत केल्यानंतर लखनौ चौथ्या नंबरवर पोहोचली आहे. सध्या गुजरात टायटन्स संघ पाचव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स सातव्या क्रमांकावर आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पंजाब किंग्स 8 व्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. आरसीबी नवव्या क्रमांकावर आहे, तर मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.
आज दिल्ली आणि कोलकाता संघात सामना होणार आहे .दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात चेन्नईचा २० धावांनी पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये ७ व्या क्रमांकांवर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स हा संघ पॉईंट्स टेबलमध्ये २ ऱ्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांसाठी जास्त उपयुक्त आहे. यावर फलंदाज मोठे फटके खेळू शकतात. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांचा कस लागणार आहे. आतापर्यंत केहलल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळविला आहे.