काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (3 एप्रिल) केरळमधील वायनाड (Wayanad) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी हे त्यांची बहीण प्रियंका गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांसमवेत पोहोचले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी वायनाड जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी संविधान टिकवून ठेवण्याची शपथ वाचून दाखवली, त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली. राहुल सकाळी हेलिकॉप्टरने वायनाडला पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी कल्पेट्टा ते सिव्हिल स्टेशन असा रोड शो केला. यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले.
जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जाण्यापूर्वी रोड शोच्या शेवटी जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जिल्ह्यातील मानव-प्राणी संघर्षाच्या घटनांसह सर्व प्रश्नांवर मी वायनाडच्या लोकांच्या पाठीशी नेहमीच उभा आहे. या डोंगराळ मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांकडे देशाचे आणि जगाचे लक्ष वेधण्यासाठी मी नेहमीच तयार असतो, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर ते सुरेंद्रन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) नेत्या ॲनी राजा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, राहुल गांधी 2019 मध्ये याच जागेवरून चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पीपी सुनीर यांना केवळ 2,74,597 मते मिळाली होती.