लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील वातावरण तापलेले दिसत आहे. मविआच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते हे सोलापूरमधले लोकसभेचे उमेदवार आहेत. दरम्यान उमेदवार जाहीर झाल्यापासून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. विरोधक खोटे आरोप करून माझे चारित्र्यहनन करतील असा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेनी केला होता. त्यावर आता राम सातपुतेंनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधक खोटे आरोप करून माझे चारित्र्यहनन करतील असा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेनी केला होता. त्यावर आता राम सातपुतेंनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही संस्कारी आहोत, आमच्यावर असले संस्कार नाहीयेत, असे म्हणत त्या आमच्या भगिनी आहेत. त्यांनी फालतू बोलण्यापेक्षा विकासावर बोलावे, मी फक्त विकासावरच बोलत असल्याचे प्रत्युत्तर राम सातपुतेंनी दिले आहे.
दरम्यान प्रणिती शिंदे यांनी खुले पत्र लिहीत राम सातपुते यांना डिवचले होते. मात्र आता सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वागत असल्याचे म्हटले आहे. पुढील ४० दिवस आपण भान राखून लोकशाहीचा आदर राखून आपण विचारांची लढाई विचारांनी लढूया. हे शहर सर्वधर्मसमभाव मानणारे आहे. समाजाच्या विकासासाठी लढाई लढूया. असे आपल्या पत्रात प्रणिती शिंदे यांनी लिहिले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मतदारसंघातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. सोलापूरची जनता कोणाला मतदान करून लोकसभेत पाठवणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.