काल संध्याकाळी काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी सूचक ट्विट करत आपण पक्षाला एक आठवडयाचा वेळ दिला होता आता उद्या आपण योग्य तो निर्णय घेऊ असे म्हंटले होते. त्याप्रमाणे आज काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गेना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा संजय निरुपम यांनी आज पाठवला आहे आज सकाळी साडेअकरा वाजता आपली पुढील राजकीय भूमिका संजय निरूपम जाहीर करणार आहेत.
गेले काही दिवस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या हातात गेल्याने काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे नाराज होते. आणि त्यांनी आपली नाराजी अनेक वेळा स्पष्टपणे व्यक्त केली होती. याचदरम्यान त्यांच्या शब्दांना धार आली होती. . तर एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमनं उधळली होती. यासगळ्याबाबत संजय निरुपम यांच्याबाबत तक्रारी समोर आल्यानंतर काल काँग्रेस पक्षाने सहा वर्षांकरीता त्यांच्यासाठी दार बंद केले होते. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाविषयी केलेले वक्तव्य त्यांच्या अंगलट आले. पक्षविरोधातील वक्तव्य आणि पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचे नाव स्टार प्रचारकातून हटविण्यात आले होते. .या पार्श्वभूमीवर आज संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना, काँग्रेस असा प्रवास केलेले संजय निरुपम यांना काँग्रेसची संस्कृती झेपली नाही असे म्हणणे आता योग्य ठरणार आहे. यानंतर संजय निरुपम हे शिदे गटात जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अर्थात याविषयीची अधिकृत भूमिका त्यांनी अजून जाहीर केलेली नाही. सध्या वायव्य मुंबई ह मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. निरुपम साहजिकच या मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहेत. या सगळ्यात शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. निरुपम हे पक्षात आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले आहेत तसेच लोकसभा उमेदवारीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आक्रमक नेते म्हणून ओळख असणाऱ्या संजय निरुपम यांचा दारुगोळा महाविकास आघाडीच्या विरोधात कसा वापरण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.