आज सकाळी जपानच्या होन्शुच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीकडून सांगण्यात आले आहे.
सकाळी 8:46 वाजता जपानमध्ये झालेल्या भूकंपाची खोली 55 किमी होती . मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
काल तैवानला धडकलेल्या ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
काल तैवानमध्ये झालेल्या जवळपास एक चतुर्थांश शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला असून 143 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत आणि 1,000 हून अधिक जखमी आहेत. काल रात्री 10:00 वाजेपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, नऊ मृतांमध्ये पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
२ एप्रिललाही जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात मंगळवार, २ एप्रिल रोजी भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.