झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान-सक्षम ईव्ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्मने आर्थिक वर्ष २४ मध्ये महसूलात तिप्पट वाढीसह उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. या अपवादात्मक वाढीमधून शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्सच्या माध्यमातून शेवटच्या अंतरांपर्यंतच्या डिलिव्हरी सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती झिप इलेक्ट्रिकची अविरत कटिबद्धता दिसून येते. एशिया-पॅसिफिक २०२४ च्या झपाट्याने विकसित होणाऱ्या व्यवसायांच्या संपूर्ण यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरलेल्या झिप इलेक्ट्रिकने २०१९ ते २०२२ पर्यंत ३९६ टक्क्यांचा कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट (सीएजीआर) संपादित केला आहे.
भारतभरात इलेक्ट्रिक स्कूटर्सचा अतिरिक्त ताफा यशस्वीरित्या तैनात करत झिप इलेक्ट्रिकने दिल्ली एनसीआर, बेंगळुरू व मुंबई अशा सहा प्रमुख महानगरीय शहरांमधील आपली उपस्थिती वाढवली आहे. ११,००० वरून २०,००० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल्सपर्यंत वाढीमधून कंपनीची शाश्वत लॉजिस्टिक्स व गतीशीलता व्यासपीठाप्रती समर्पितता दिसून येते.
झिप इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता म्हणाले, ”मागील आर्थिक वर्ष आमच्यासाठी संस्मरणीय ठरले आहे. आमच्या महसूलामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास तीन पट वाढ झाली आहे, ज्यामुळे मला आव्हानात्मक ईव्ही लँडस्केपमध्ये हा टप्पा संपादित करणाऱ्या आमच्या टीमचा खूप अभिमान वाटतो. अधिकाधिक हब्सची भर करत एनसीआर व बेंगळुरूमध्ये वाढ करण्यासह आम्ही यंदा मुंबईमध्ये कार्यसंचालनांना सुरूवात केली. अधिक पुढे जात आम्ही हैदराबादमध्ये आमच्या सेवा सुरू करण्यास उत्सुक आहोत आणि प्रत्येक तिमाहीमध्ये नवीन शहरामध्ये लाँच होण्याचे लक्ष्य आहे. ताफ्यासंदर्भात आमचा २०,००० वेईकल्सची विद्यमान क्षमता पुढील १२ ते १८ महिन्यांमध्ये १००,००० वेईकल्सपर्यंत वाढवण्याचा आणि त्यानंतर पुढील ३६ ते ४८ महिन्यांमध्ये ही आकडेवारी ५००,००० हून अधिक वेईकल्सपर्यंत नेण्याचा मनसुबा आहे. लाभक्षमता पुढील प्रमुख टप्पा आहे, ज्याकडे झिपमध्ये आम्ही विकासासह लक्ष ठेवून आहोत.”
क्विक-कॉमर्स, फुड डिलिव्हरी, बाइक टॅक्सी, ई-कॉमर्स आणि इतर ऑनलाइन व्यवसायांसोबत सहयोग करत कंपनी भारतात १०० टक्के इलेक्ट्रिक लास्ट-माइल डिलिव्हरींच्या खात्रीसाठी सक्रियपणे काम करत आहे. झिप इलेक्ट्रिकने जानेवारी २०२३ ते फेब्रवुारी २०२४ या कालावधीदरम्यान इलेक्ट्रिक वेईकल्सच्या माध्यमातून ४५ दशलक्षहून अधिक शिपमेंट डिलिव्हरीज केल्या आहेत, जे पृथ्वीवर ७६ लाख झाडांची लागवड करण्याइतके आहे. गेल्या वर्षभरात झिप इलेक्ट्रिकने ५३,०० हून अधिक डिलिव्हरी कार्यकारींना इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब करण्यासह प्लॅटफॉर्मवर कमाई करण्याची संधी दिली आहे. प्रति राइडर त्यांच्या मासिक सरासरी कमाईमध्ये देखील वाढ झाली आहे, जी प्रतिमहिना २४,००० रूपयांहून अधिक आहे, तसेच पेट्रोल बाइक राइडर्सच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक बचत देखील करता येते. त्यांच्या पर्यावरणास अनुकूल उपक्रमांनी कार्यसंचालनांना सुरूवात केल्यापासून कार्बन उत्सर्जन २९ दशलक्ष किलोग्रॅमने कमी केले आहे.