लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections 2024) बिगुल वाजल्यापासून वायनाडच्या राजकारणात स्मृती इराणींचा (Smriti Irani) रोड शो शिगेला पोहोचला आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहेत. यादरम्यान, केरळ भाजपचे प्रमुख आणि वायनाडचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी आज रोड शो केला.
के सुरेंद्रन यांच्यो रोड शोमध्ये त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील दिसल्या. यावेळी स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
या सभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, मी त्या मतदारसंघातून आले आहे जिथे गांधी घराण्याची 50 वर्षे सत्ता होती, पण आता त्यांचा पराभव झाला आहे. केरळमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 150 हून अधिक स्वयंसेवकांच्या आशीर्वादाने आज आम्ही या प्रवासाची सुरुवात करत आहोत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. तसंच स्मृती इराणी या राहुल गांधींच्या प्रतिस्पर्धी असल्याचे भाजपचे मत आहे. कदाचित याच कारणामुळे आता स्मृती इराणी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघाच्या प्रचारासाठी पाठवण्यात आले आहे. राहुल 2019 मध्ये अमेठीमधून पराभूत झाले होते, परंतु ते वायनाडमध्ये मोठ्या फरकाने विजयी झाले होते.