धाराशिवमध्ये (Dharashiv) महायुतीचा उमेदवार अखेर ठरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्याविरोधात महायुतीकडून अर्चना पाटील (Archana Patil) लढणार आहेत. अर्चना पाटील या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत.
अर्चना पाटील यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर धाराशिवमधून त्यांची उमेदवारी देखील घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्चना पाटील ओमराजे निंबाळकरांना टक्कर देणार आहेत.
धाराशिवची जागा ही राष्ट्रवादीकडे होती, त्यामुळे राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी अजित पवार यांनी धाराशिवची जागा राणा जगजितसिंह पाटील यांनी लढवावी असा प्रस्ताव दिला होता. पण यासाठी राणा पाटील यांनी नकार दिला आहे. त्यांनी आज सकाळीच अजित पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर आता राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मैदनात उतरवण्यात आलं आहे.