लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून हिंगोलीत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार भावना गवळी या इच्छुकी होत्या. मात्र आता त्यांचा देखील पत्ता आता कट करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशीममध्ये संजय राठोड यांचे नाव चर्चेत होते. मात्र या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान आज यवतमाळ-वाशिमच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजश्रीम पाटील आणि हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. यानंतर यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा झाली. या सभेतील भाषणावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भावना गवळी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,” राजकारणात आपल्याला वेगळे निर्णय घ्यावे लागतात. मात्र कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळी यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. महायुतीचा अनादर करणार नाही.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार भावना गवळी या इच्छुकी होत्या. मात्र आता त्यांचा देखील पत्ता आता कट करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशीममध्ये संजय राठोड यांचे नाव चर्चेत होते. मात्र या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता देखील कट झाला आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी भावना गवळीने सर्वस्व पणाला लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्ष बंगल्यावर त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. मात्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांचा नूर पूर्णपणे बदलला होता. तेव्हाच कदाचित त्यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते.