लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट यांनी राज्यात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी आपली लोकसभेची पहिली यादी जाहीर केली होती. आज शरद पवार गटाने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये शरद पवारांनी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. बीड आणि भिवंडीमध्ये शरद पवार गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दोन उमेदवारांची यादी जाहीर केली होती. बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिल्या यादीमध्ये शरद पवार गटाने ५ उमेदवार जाहीर केले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. मात्र, बजरंग सोनावणे यांनी गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. बीडमध्ये आता बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत पाहायला मिळणार आहे.