सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारने एक अॅप लाँच केले आहे. नागरिकांना त्यांच्या आरोग्य योजनेच्या नोंदी सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने नवीन ॲप लाँच केले आहे. ‘MyCGHS’ नावाचे हे ॲप असून सध्या ते फक्त iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
या अॅपद्वारे सरकार आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी, माहिती आणि संसाधने उपलब्ध करून देईल. तसंच ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी या ॲपमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.
‘माय-सीजीएचएस’ ॲप ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करणे आणि रद्द करणे, सीजीएचएस प्रयोगशाळांमधून अहवाल मिळवणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती दाव्याची स्थिती तपासणे आणि जवळपासची आरोग्य केंद्रे आणि पॅनेल केलेली रुग्णालये, प्रयोगशाळा आणि दंत युनिट शोधणे यासह अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करते.
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, हे ॲप आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील CGHS साठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, MyCGHS ॲपमध्ये कोणत्याही पेमेंट ॲपप्रमाणेच द्वि-घटक प्रमाणीकरण आणि पिन सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.