एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार, खासदार त्यांच्यासोबत गेले होते. पण, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक नवीन राजकीय ट्वि्स्ट आला आहे. कारण आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले काही खासदार पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेत खासदारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे काही खासदारांमध्ये नाराजीचे वातावरण असून ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या 7 आमदारांची काय गती झाली आहे. उद्धव ठाकरे आपल्याला भेटत नव्हते असे म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही. निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत.
शिदे गट आणि अजित पवार गट देखील गोंधळलेले आहेत. भाजपची तर दमछाक होत आहे. तर आता इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.