लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर राज्यात देखील महायुतीचे नेते आणि राज ठाकरेंमध्ये बैठक झाला. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच मनसेने लोकसभेच्या ३ जागांची मागणी केल्याचेही समजते आहे. आता दरम्यान राज ठाकरेंनी मनसैनिकांना साद घातली आहे. मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे. काय घडते आहे ते सांगायचे आहे. हे सगळे गुढीपाडव्याच्या सभेत सांगणार असल्याचे बोलले जात आहे.
गुढीपाडव्याच्या सभेचा ट्रेलर राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट केला आहे. ”९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे !” असे या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे.
सध्या मनसे – महायति यांच्यात चर्चा सुरु आहेत. दिल्लीत देखील अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट झाली होती. दरम्यान आपण राज्यात देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटीगाठी होत असल्याचे पाहिले आहे. भाजपा-मनसे युती झाल्यास मतांचे विभाजन टाळण्यास मदत होणार आहे. मनसेकडे मराठी वोटबँक मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास उद्धव ठाकरेंना निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना शहा देण्यासाठी मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना भाजपने केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सर्वांशी काय बोलतात आणि सांगतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.