पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शेख शाहजहान याच्याशी संबंधित दोन कॉर्पोरेट संस्थांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकाऱ्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई सुरू केली आहे.
सूत्रांनी सांगितले की या दोन कॉर्पोरेट संस्थाची नवे मेसर्स मॅग्नम आणि मेसर्स अरुप सोम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी या दोन कॉर्पोरेट संस्थांशी जोडलेली बँक खाती ओळखली आहेत आणि संबंधित बँक अधिकाऱ्यांना त्या खात्यांमधील व्यवहार सुविधा त्वरित बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या दोघांसह, 5 जानेवारी रोजी संदेशखाली येथे ईडी आणि सीएपीएफ कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार, शाहजहानशी संबंधित एकूण तीन कॉर्पोरेट संस्था केंद्रीय एजन्सीच्या स्कॅनरखाली आल्या आहेत.
तत्पूर्वी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांना शहाजहानची मुलगी शेख सबिना हिच्या नावाने नोंदणीकृत असलेल्या मेसर्स शेख सबिना फिश सप्लाय ओन्ली या फिश एक्सपोर्ट युनिटशी जोडलेले बँक खाते तात्काळ गोठवण्याचे निर्देश दिले होते. बँक जप्त करण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. ही खाती शेल कंपन्या म्हणून वापरली जात असल्याचा सुगावा मिळाल्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये, विशेषत: रेशन वितरण प्रकरणात बेकायदेशीर कमाई लपवण्याचा त्याचा हेतू होता.