आरबीआयची (RBI) बैठक 3 एप्रिलपासून सुरू झाली असून आज पतधोरणांबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे.आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्या बैठकीत आरबीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस या सिस्टिमद्वारे बँकांमध्ये रोख जमा करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता ग्राहकांना ATM कार्डशिवाय बँकेत कॅश भरता येणार आहे. लवकरच ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
या सेवेमुळे लोकांची मोठी सोय होणार असल्याचे शक्तीकांत दास यांनी सांगितले. रोख पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार नाही. तसेच, बँक तुमच्यापासून दूर असल्यास, तुम्ही UPI द्वारे रोख रक्कम जमा करू शकाल. याशिवाय, पीपीआय (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) कार्डधारकांना पेमेंट सुविधा देखील प्रदान केली जाईल. या लोकांना थर्ड पार्टी यूपीआय ॲप्सद्वारे UPI पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव आहे.
UPI द्वारे रोख जमा करण्याची सुविधा उपलब्ध असेल, तर तुम्हाला एटीएम कार्ड खिशात ठेवण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. यामुळे एटीएम कार्ड सांभाळत बसण्याची, ती हरविण्याची चिंता देखीलदूर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो दर 6.5 टक्के आहेत आणि तोच रेपोरेट कायम राहणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सामान्यावरचा कर्जाचा बोजा आणखी वाढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.