राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दोन शहरांचे नाव बदलण्याचा करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्यात आले आहे. आता राज्यात आणखी एका शहराचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांनी अलिबाग शहराचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली आहे. अलिबागचे नाव बदलून ‘मायनाक’ नगरी असे करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पत्र लिहून अलिबागचे नाव बदलण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली आहे. अलिबागचे नाव मायनाक नागरी ठेवण्यात यावे आणि मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक बांधण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे. मात्र अलिबागचे नाव बदलण्याच्या मागणीला अलिबागमधूनच विरोध होताना दिसत आहे.