पुणे : एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात आंतर्धर्मीय विवाह करण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. मात्र याच पुरोगामी महाराष्ट्रात आपल्या मुलीने केवळ परधर्मातील मुलाशी लग्न केल्याच्या रागातून तिचा गर्भ मारण्याचे अश्लाघ्य कृत्य व गंभीर गुन्हा पुण्यासारख्या प्रगत शहरात नुकताच घडला आहे.
आपल्या घरातील मुलगी एका हिंदू घरात लग्न करून गेली ही बाब सहन न झाल्याने तिच्याच माहेरच्या कुटुंबातील नराधमांनी तिचे बाळ मारून टाकल्याची भीषण घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या सोमवार पेठेत ही घटना घडली असून जिहादी नवाज खानच्या हल्ल्यात गर्भवती महिलेने पोटातच आपले बाळ गमावले आहे.
दि. २६ मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली. दि. २६ मार्चची मध्यरात्र ते २७ मार्चच्या पहाटेपर्यंत फिर्यादी राजू माधवराव चित्रावरे आणि त्याची बायको मीरा हिला नवाज खान आणि त्याच्या कुटुंबियांनी जबर मारहाण आणि शिवीगाळ केली. राजू चित्रावरे यांच्या बिल्डींगमध्ये नवाज खान आणि त्याचे कुटुंब राहते. गेले काही दिवस नवाज खान मुद्दाम काहीही कारण काढून राजू चित्रावरे आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास देत होता.
यावेळी राजू यांच्या पत्नी मीरा या गर्भवती होत्या. ह्या झालेल्या मारहाणी दरम्यान त्यांचे ८ महिने २० दिवसाचे बाळ पोटातच दगावले व मीरा यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यानंतर राजू यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या संदर्भात राजू चित्रावरे यांनी काल म्हणजे घटनेनंतर जवळपास दहा दिवसांनी सोमवार पेठेतील समर्थ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. नवाज खान आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.